क्राईम

ब्रेकिंग! नागपूर हिंसाचारामागील दुसरा मास्टरमाईंड सापडला, कोण आहे सय्यद असीम अली ?

नागपूर हिंसाचार प्रकरणात फहीम खानला अटक केल्यानंतर आता आणखी एका नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. आता या हिंसाचार प्रकरणामध्ये सय्यद असीम अलीचे नाव समोर आले आहे. सय्यद असीम अली हा हिंसाचाराचा दुसरा मास्टरमाईंड असल्याचे सांगितले जात आहे.

फहीम आणि सय्यद असीम अली हे एकमेकांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली आहे. सय्यद असीम अलीला कमलेश तिवारी हत्याकांडामध्ये अटक करण्यात आली होती. सय्यदचे कनेक्शन समोर आल्यानंतर नागपूर हिंसाचार प्रकरणात आता एनआयएची एन्ट्री होण्याची शक्यता आहे.

फहीमप्रमाणे सय्यद मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पक्षाचे काम करतो. त्याने नागपूरमध्ये केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्याला सहा हजार मते मिळाली होती. सय्यद असीम अली हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पक्षाचा पदाधिकारी आहे. त्याला हत्या प्रकरणात अटक झाली होती. पण त्याला 2024 मध्ये सुप्रीम कोर्टाकडून जामीन मिळाला. तो औरंगजेबाचा समर्थक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सय्यद एक युट्यूब चॅनेलही चालवत होता.

Related Articles

Back to top button