राजकीय

विधानसभेत पराभवाचा धक्का

राज्यातील सगळ्याच पक्षांनी विधानसभा निवडणूक निकालानंतर महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीत अपयश मिळाल्यानंतर आता ठाकरे गटाने मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. ठाकरे गटासाठी आपल्या राजकीय अस्तित्वासाठी मुंबई महापालिकेची निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. याच अनुषंगाने मातोश्रीवर बैठका सुरू आहेत. या बैठकीत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंकडे स्वबळाचा सूर लावला आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणूक ठाकरे गटाने महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवली. लोकसभेत यश मिळाले तरी विधानसभा निवडणुकीत अपयश मिळाले. त्यामुळे आता महापालिका निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. ठाकरे गटाच्या बैठकांमध्ये बहुतांश विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांचा महापालिका निवडणुकीसाठी “एकला चलो रे” ची भूमिका पक्ष प्रमुख ठाकरेंसमोर मांडली आहे.

मातोश्रीवर घेत असलेल्या आढावा बैठकांमध्ये आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याची इच्छा पदाधिकाऱ्यांनी उद्धव यांच्यासमोर बोलून दाखवली. मातोश्रीवरील बैठकीत उद्धव सध्या संघटनात्मक आढावा घेत आहेत. ठाकरे यांच्या शिवसेनेकडून अद्याप कुठलाही निर्णय घेतला जात नाही. या बैठकांमध्ये उद्धव हे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत आहेत.

Related Articles

Back to top button