क्राईम
खळबळजनक! लातूर मनपा आयुक्तांनी स्वतःवरच झाडली गोळी

- लातूर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लातूर महापालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी रात्री मनोहरे यांच्या शासकीय निवासस्थानी घडली. या घटनेत मनोहरे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने लातूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर तत्काळ उपचार सुरू करण्यात आले. मनोहरे यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.
- घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रिव्हॉल्वर ताब्यात घेत तपास सुरू केला आहे. मनोहरे यांनी स्वतःवर गोळीबार करण्यापर्यंत असे काय घडले, यामागे काय कारण आहे, याची माहिती घेण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. मात्र अद्याप ठोस माहिती मिळालेली नाही.
- या घटनेची लातूर शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. नागरिकांतही संभ्रम आहे. मनोहरे यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला असावा, असा प्रश्न लोकांमधून विचारला जात आहे. मनोहरे यांनी कौटुंबिक कारणातून की त्यांच्यावरील कार्यालयीन तणावात त्यांनी हा निर्णय घेतला का, अशी चर्चा लातुरकरांत सुरू आहे.



