महाराष्ट्र
मुलगी जर दिसायला एक नंबर देखणी असेल तर…

राष्ट्रवादी अजितदादा पवार गटातील आमदार देवेंद्र भुयार यांनी मुलींबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. जाहीर भाषणात त्यांनी मुलींच्या दिसण्यावरून कमेंट केली आहे. त्यांच्या भाषणाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ अमरावती येथील एका जाहीर सभेतील आहे. यानंतर आरोप- प्रत्यारोप केले जात आहेत.
मुलगी जर दिसायला खुपच स्मार्ट असेल, एक नंबरची देखणी मुलगी असेल तर ती नोकरीवाल्या मुलाला मिळते. ती तुमच्या, माझ्यासारख्या पोरांना भेटत नाही. त्यासाठीनोकरी लागते. दिसायला दोन नंबरची पोरगी कोणाला भेटते, तर ज्यांची पान टपरी आहे, धंदा किंवा किराणा दुकान आहे. दिसायला तीन नंबर असणारी व राहिलेला गाळ शेतकऱ्यांच्या पोरांना भेटतो, शेतकऱ्यांच्या पोरांचे काही खरे नाही, असे वादग्रस्त विधान भुयार यांनी केले आहे.



