सोलापूर
ब्रेकिंग! सोलापूरला अवकाळी पावसाचा दणका

सोलापूर जिल्ह्यात आज पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मेघगर्जनेसह पाऊस झाला. या पावसामुळे चांगलाच गोंधळ उडाला. दरम्यान हवामान विभागाकडून छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अहिल्यानगर, लातूर, धाराशिव, नांदेड आणि बीडमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
तसेच पुणे आणि पिंपरी- चिंचवडला अवकाळी पावसाने झोडपून काढले. पिंपरी- चिंचवड शहरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अर्धा ते पाऊण तास झालेला पावसाने सखल भागात पाणी साचले होते.