शाहिद आफ्रिदीला पाकिस्तानी लोकांकडून मारहाण

पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि ऑलराउंडर शाहिद आफ्रिदी याने पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरुन भारतावर गंभीर आरोप केले होते. आफ्रिदीच्या या आरोपांवरुन टीम इंडियाची माजी क्रिकेट शिखर धवन याने आफ्रिदीची लायकी काढली. त्यानंतर आता सोशल मीडियावर आफ्रिदीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओत पाकिस्तानमधील लोक आफ्रिदीला चोप देत आहेत.
आफ्रिदीची धुलाई करत असल्याचा व्हिडीओ हा शिखर धवन या फेक अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओत आफ्रिदीने त्याच्या चाहत्याला कानशिलात लगावली होती. त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्यांनी आफ्रिदीला चांगलाच तुडवला होता. पाकिस्तानमधील लोकांनी आफ्रिदीला पळवून पळवून हाणला होता. आफ्रिदी तिथून कसा तरी निघून गेला.
आफ्रिदी याला चोप देतानाचा व्हायरल झालेला व्हिडीओ हा 23 मार्च 2012 रोजीचा असल्याचे म्हटले जात आहे. तेव्हा पाकिस्तान पराभूत होऊन मायदेशी परतला होता. तेव्हा चाहत्यांनी आफ्रिदीला विमानतळावर घेरले होते. तेव्हा एकाने केलेल्या कमेंटमुळे आफ्रिदी भडकला. संतापलेल्या आफ्रिदीने त्या चाहत्याला कानशिलात लगावली. त्यानंतर आफ्रिदीचे चाहते आफ्रिदीवर तुटून पडले आणि त्याला लाथाबुक्क्यांचा जोरदार प्रसाद दिला.



