क्राईम

हॅलो, मी गौरीला मारलंय, पतीचा सासरच्यांना फोन

  • पुण्यातील रहिवासी असणाऱ्या एका तरुणीची बंगळुरूमध्ये हत्या झाल्याची भयंकर घटना उघडकीस आली आहे. आयटी कंपनीत काम करणाऱ्या पतीनेच पत्नीची निर्घृण हत्या केली आहे. हत्येनंतर आरोपीने पीडितेचा मृतदेह एका सुटकेसमध्ये भरून ठेवला होता. यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. पण हत्येनंतर अवघ्या २४ तासांत पोलिसांनी पुण्याजवळून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीला आता बंगळुरूला आणले जात आहे.
  • गौरी खेडेकर असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. तिचा दोन वर्षांपूर्वी आरोपी राकेश राजेंद्र खेडेकर याच्याशी विवाह झाला होता. महिनापूर्वी दोघंही बंगळुरूला शिफ्ट झाले होते. मात्र महिनाभरात आरोपी राकेशने गौरीला भयंकर मृत्यू दिला आहे. राकेशने बुधवारी रात्री गौरीची निर्घृण हत्या केली. यानंतर तिच्या शरीराचे तुकडे करून सुटकेसमध्ये भरल्याचे सांगितले जात आहे. मात्र मृतदेहाचे खरंच तुकडे केले होते का? याला पोलिसांनी अद्याप दुजोरा दिला नाही.
  • मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी राकेश आणि गौरी यांच्यात किरकोळ कारणातून अनेकदा वाद होत होते. बुधवारी रात्री जेवण करत असताना दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर गौरीने आधी राकेशला मारले. यानंतर संतापलेल्या राकेशने किचनमधील चाकू घेऊन गौरीवर हल्ला केला. त्याने तीन वार करत गौरीला रक्ताच्या थारोळात पाडले.
  • हत्येनंतर राकेशने गौरीचा मृतदेह एका सुटकेसमध्ये भरला आणि ही सुटकेस घरातील बाथरुममध्ये नेऊन ठेवली. हत्येनंतर राकेश राहत्या घरातून फरार झाला. बंगळुरू सोडल्यानंतर त्याने घरमालक आणि सासरच्यांना फोन करून गौरीला मारल्याची माहिती दिली. यानंतर घरमालकाने गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता पोलिसांना फोन करून ही माहिती दिली. यानंतर हे प्रकरण उजेडात आले.

Related Articles

Back to top button