क्राईम

ओम साई राम… भीषण अपघाताचे फोटो समोर

  • बॉलिवूड अभिनेता सोनू सूदची पत्नी सोनालीचा मुंबई-नागपूर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये ती जखमी झाली आहे. सोनू सूदची पत्नी सोनाली सूद गाडीने नागपूरला येत असताना तिची गाडी एका ट्रकखाली चिरडली गेली. सोनाली सूद गाडीच्या पुढच्या सीटवर बसली होती. तर तिच्या कुटुंबातील सदस्य, मेहुणी आणि इतर नातेवाईक मागे बसले होते. सोनालीवर सध्या नागपूरमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
  • सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाली तिच्या बहिण आणि भाच्यासोबत गाडीतून मुंबई- नागपूर हायवेवरून प्रवास करत होती. ही घटना सोमवारी रात्री घडली आहे. या भीषण अपघातामध्ये सोनाली जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
  • सोनाली सूद हिचा अपघात झाल्याची माहिती जवळच्या नातेवाईकांनी दिली आहे. पण तिची प्रकृती चिंत्ताजनक नसल्याचे देखील सांगितले आहे. सोनू सूदने या घटनेवर प्रतिक्रिया दिली आणि सांगितले की, पत्नी आता ठीक आहे. चमत्कारच झाला की काहीही नुकसान झाले नाही. ओम साई राम.

Related Articles

Back to top button