क्राईम
मेहुणीसाठी झाला वेडापिसा, मित्राच्या मदतीने बायकोचा काढला काटा

- मेहुणीसाठी पतीने पत्नीची हत्या केली आहे. पत्नीचा काटा काढण्यासाठी त्याने एक प्लान रचला. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता पतीनेच पत्नीचा काटा काढला असल्याचे समोर आले. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील बिजनोर जिल्ह्यातील एका गावात घडली आहे. या प्रकरणी घटनेचा तपास करून पोलिसांनी आरोपी पती आणि त्याच्या साथीदाराला बेड्या ठोकल्या आहेत.
- नागेना पोलीस स्टेशन परिसरात अंकितकुमार आपली पत्नी किरणसोबत राहत होता. तो पत्नीच्या माहेरी किरणला आणण्यासाठी गेला होता. रचलेल्या कटाप्रमाणे त्याने पत्नीला सासरी नेण्यासाठी बाईक आणली. तेथून दोघेही निघाले. रस्त्यावर राजपुरा पेट्रोल पंपावर बाईकमध्ये पेट्रोल भरण्यासाठी थांबले.
- मिळालेल्या माहितीनुसार, पती बाईकमध्ये पेट्रोल भरण्यासाठी गेला. तेव्हा त्याने किरणला रस्त्यावर फेरफटका मारायला सांगितले. यादरम्यान, भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकीने किरणला धडक दिली. धडक दिल्यानंतर कारचालक कार घेऊन पसार झाला. जबर धडकेत किरणचा जागीच मृत्यू झाला.
- अंकितने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आणि पत्नीचे अपघाती मृत्यू झाल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांनी तपास सुरूच ठेवला. सीसीटीव्ही फुटेज तपासले. पोलिसांना अंकितवर संशय आला. त्यांनी अंकितला ताब्यात घेतले.
- अंकितला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. पोलीस तपासात अंकितनेच किरणच्या हत्येचा कट रचला असल्याचे सिद्ध झाले. पोलीस चौकशीत अंकितने सांगितले की, लग्नाला पाच वर्ष झाले. तरीही पत्नी गरोदर राहत नव्हती.
- यादरम्यान, मेहुणीसोबत प्रेमसंबंध जुळले. त्याला मेहुणीसोबत लग्न करायचे होते. परंतु, मेहुणीने लग्न करण्यास नकार दिला होता. कारण तो विवाहित होता. त्यानंतर अंकितने बायकोचा काटा काढण्याचे ठरवले. यासाठी त्याने मित्राची मदत घेतली असल्याचे सांगितले.



