क्राईम

ब्रेकिंग! शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अटक

इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी प्रकरणातील आरोपी प्रशांत कोरटकरला अखेर तेलंगणातून अटक करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचाही त्याच्यावर आरोप आहे.

तो गेल्या चार दिवसांपूर्वीच चंद्रपुरातील एका हॉटेलमध्ये मुक्कामी होता. तेथून तो थेट तेलंगणात पळाला होता. मात्र कोल्हापूर पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन तेलंगणातून अटक केली.

सावंत यांना धमकी प्रकरणात आरोपी असलेल्या कोरटकरविरोधात नागपूर, कोल्हापूर आणि जालना येथे गुन्हे दाखल आहेत. त्याचा जामीन फेटाळल्यानंतर त्याला अटक करण्यासाठी कोल्हापूर येथील पोलिसांचे पथक नागपुरात पोहोचले. तो त्याच्या निवासस्थानी आढळला नाही. पोलीस पथकाने चंद्रपूर व मध्यप्रदेशात त्याचा शोध घेतला. बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या मदतीने त्याचा शोध सुरू होता. नागपूर सायबर पोलीस ठाण्याचीदेखील यासाठी मदत घेण्यात आली होती.

कोरटकर सुरुातीला चंद्रपुरातील एका हॉटेलमध्ये मुक्कामी होता. हे समजल्यावर कोल्हापूर पोलिसांनी चंद्रपुरातछापा घातला. मात्र, काही तासांपूर्वीच त्याला पोलिसांबाबत माहिती मिळाल्याने तो पळून गेला. फॉरेन्सिक लॅबमधील तपासणीसाठी आणि आवाजाचे नमुने घेण्यासाठी कोरटकर यांना अटक होणे गरजेचे होते. मात्र, अंतरिम जामीन मिळाल्याने कोरटकरला अटक करता येत नव्हती.

कोरटकर ज्या वाहनातून फिरत होता त्या वाहनाच्या मागावर कोल्हापूर पोलिसांचे एक पथक होते. कोरटकरने चंद्रपुरातून एका क्रिकेट बुकीच्या कारने पळ काढला. त्यानंतर काही अंतरावर गेल्यानंतर त्याने दुसऱ्या वाहनातून प्रवास सुरू केला. त्यामुळे कोल्हापूर पोलिसांना तपासात अडचणी आल्या. अखेर कोल्हापूर पोलिसांना दुसऱ्या वाहनाचा देखील शोध लागल्याने तेलंगणा येथे जाऊन कोरटकरला बेड्या ठोकल्या.

Related Articles

Back to top button