क्राईम
बिग ब्रेकिंग! आधी हत्या केली, मग अपघाताचा रचला बनाव, पण…

- राज्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एक विचित्रच अपघात घडल्याची घटना घडली आहे. या अपघातात बाईक चालकाचे शिर धडावेगळे झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हे ऐकून तुम्हालाही धक्का बसला असेल. पण गोंदियात अशाप्रकारची घटना घडली आहे. विशेष म्हणजे एखादा अपघात झाला तर शक्यतो गाडीचा चेंदामेंदा होतो किंवा चालकाला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू होतो. मात्र या अपघातात थेट बाईक चालकाचे शीर धडावेगळे झाले आहे.
- त्यामुळे हा अपघात आहे की घातपात, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.गोंदिया जिल्ह्यातील देवरी-चिचगड मार्गावर ही घटना घडली आहे. या घटनेत बाईकचा एक विचित्र अपघात घडला आहे. या अपघातात बाईकस्वाराचे धडापासून मुंडके वेगळे झाले आहे. ही घटना सालईजवळ घडली.
- मात्र या अपघातात बाईकस्वाराचे धडापासून मुंडके वेगळे झाल्याने हा अपघात की घातपात, अशी शंका व्यक्त केली जात आहे. निकेश आत्माराम कराडे (३२) रा. मोहगाव, ता. देवरी असे अपघातात ठार झालेल्या बाईकस्वाराचे नाव आहे.



