महाराष्ट्र
राऊत जामिनावर सुटलेत, निर्दोष नव्हे

- न्यायालयाने शिवसेना खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर केला. यानंतर राऊत यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. संजय यांनी प्रतिक्रिया देताना, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचीच खरी शिवसेना महाराष्ट्रात उरलीय, असं म्हटलं होतं. यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलं की, राऊत काही वक्तव्ये करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत. तुम्ही शक्तीप्रदर्शन म्हणताय. पण फार मोठं शक्तीप्रदर्शन झालं नाही. मला पाठिंबा आहे, हे दाखवायचा प्रयत्न झाला. राऊत यांना जामीन मंजूर झाला आहे, त्यांची निर्दोष मुक्तता झालेली नाही. त्यामुळे सेलिब्रेशन करण्याची आवश्यकता नाही.
आमच्या पक्षाचं नावच बाळासाहेबांची शिवसेना आहे. राऊतसाहेब १०० दिवस कारागृहात होते म्हणून त्यांना काही गोष्टी अपडेट नसतील. आम्ही शिवसेना सोडलेली नाही, बहुमताततली शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेनाच आहे.आता राऊतसाहेब काही वक्तव्ये करून संभ्रम निर्माण करत आहेत, असे ते म्हणाले.



