क्राईम

संतोष देशमुख यांची हत्या झाली, तशी दुसरी घटना पुन्हा…

  • संतोष देशमुख यांची जी हत्या झाली, तशी दुसरी घटना पुन्हा घडणार नाही. याची खात्री कुणीही देऊ शकत नाही. आज राज्यातच अशा घटना सगळीकडे घडत आहेत. आता नागपूर तर पेटलेच आहे, असे म्हणत मंत्री पंकजा मुंडे यांनी देशमुख हत्या प्रकरणावर भाष्य केले आहे. माझ्या दृष्टीने या विषयावरून आता आपण महाराष्ट्रातील पुढच्या विषयाकडे वळले पाहिजे, असे त्या म्हणाल्या आहेत.
  • यावेळी त्यांना ज्यावेळी बीड जिल्ह्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्या रागावल्याचे दिसले. आज जी बीड जिल्ह्यात परिस्थिती आहे ती दाखवली जात आहे तशी नाही. काही लोकांनी ती तशी तयार केली आहे. त्यामुळं येत्या काळात ती परिस्थिती बदलणार आहे, असेही पंकजा म्हणाल्या आहेत.
  • गोपीनाथ मुंडे आत्ताच्या परिस्थितीत असते तर काय परिस्थिती असती या प्रश्नावर बोलताना पंकजा यांनी त्यांची कुणाशी तुलना करण योग्य नाही. मुंडे हे दाऊदला घाबरत नव्हते. त्यामुळे त्यांच्या काळ वेगळा होता. मात्र, आताही मी कुणाच्या शब्दांच्या गोळ्यांना घाबरत नाही, असेही पंकजा म्हणाल्या. 

Related Articles

Back to top button