देश - विदेश
नरेंद्र मोदींमध्ये दम नाही, राहुल गांधींच्या विधानावरून वादंग

- काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कायम लक्षात ठेवायला हवे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘शो’ नाहीत, ते ‘विकासाचा रोड शो’ आहेत. मोदी म्हणजे दिशा तर राहुल गांधी म्हणजे दिशाभूल हे देशातील जनतेने ओळखले आहे, अशा शब्दांत भाजपे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल यांनी काल एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर दिले आहे.
- राहुल गांधी, हा देश तुमच्या भाषणांवर चालत नाही. तो आकड्यांवर, कामांवर आणि जनतेच्या विश्वासावर चालतो. मोदी यांच्या ११ वर्षांच्या कार्यकाळात भारताने विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात भक्कम झेप घेतली आहे. देशातील तब्बल २५ कोटी लोकांना गरिबीच्या रेषेतून वर काढण्यात यश मिळाले आहे, असेही बावनकुळे म्हणाले.
- दरम्यान मोदी म्हणजे काही मोठी समस्या नाही. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही डोक्यावर बसवले आहे. मीडियावाल्यांनी फुगा तयार केला. पूर्वी तर मी भेटलो नव्हतो. आता मी दोन-तीन वेळेस भेटलो. मला आता समजले, त्यांच्यात काहीच नाही. सगळा शो आहे. काही दम नाही. तुम्ही त्यांना भेटले नाहीत, मी भेटलोय. त्यांच्यासोबत रूममध्ये बसलो. चर्चा केली आहे. काही नाही फक्त शो आहे, असे राहुल गांधी काल म्हणाले होते.



