महाराष्ट्र

महिलेला त्रास दिल्याचा आरोप; सोलापूरचे पालकमंत्री संतापले

  • ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेने त्रास दिल्याचा आरोप केला होता. यानंतर आता जयकुमार गोरे यांनी शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत, आमदार रोहित पवार आणि एका यूट्यूब चॅनेलवर हक्कभंग दाखल केला आहे. गोरे यांनी बुधवारी हक्कभंग दाखल करणार असल्याचे सूचित केले होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
  • सदर प्रकरणात न्यायालयाने माझी निर्दोष मुक्तता केली आहे. ज्यांनी आरोप केले, त्यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार आहे. अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार आहे, असा इशारा बुधवारी गोरे यांनी दिला होता. त्यानंतर आता गोरेंनी आज संजय राऊत, रोहित पवार आणि एका यूट्यूब चॅनेलवर हक्कभंग दाखल केला आहे.
  • गोरे हे सातारा जिल्ह्यातील माण-खटावचे आमदार आहेत. 2016 पासून जयकुमार गोरे यांनी महिलेला त्रास देण्यास सुरूवात केली आहे. 2016 मध्ये अनेक नग्न फोटो गोरे यांनी व्हॉट्सअ‍ॅपद्वारे महिलेला पाठवले. या त्रासाला कंटाळून महिलेने सातारा पोलिसांकडे तक्रार दाखल केली. याप्रकरणी गोरेंविरोधात गुन्हा दाखल झाला होता. अटक टाळण्यासाठी गोरेंनी सातारा जिल्हा न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण, न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला होता. गोरेंना दहा दिवस तुरुंगवारी सुद्धा झाली होती.
  • 2016 मध्ये सातारा न्यायालयात पीडित महिलेची लेखी माफी मागितली होती. तसेच, पुन्हा त्रास देणार नाही, अशी हमी वकिलामार्फंत दिली होती. परंतु, गोरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समजले जातात. तिसऱ्यांदा निवडून आलेल्या गोरेंना महायुती सरकारमध्ये ‘ग्रामविकास’सारखे तगडे खाते देण्यात आले आहे. त्यासह ते सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा आहेत.

Related Articles

Back to top button