भयंकर, राक्षसी… संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो आले समोर, सीआयडीचा तगडा तपास

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रुरपणे हत्या करण्यात आली होती. आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी सभागृहात या हत्येचे वर्णन केल्यानंतर महाराष्ट्र हादरला होता. या हत्येची चर्चा आजही होताना दिसत आहे. संतोष देशमुख यांची हत्या कशी झाली, याचे वर्णन ऐकून आजही मन सून्न होते. आता याच देशमुखांच्या हत्येचे फोटो समोर आले आहेत. सीआयडीने दाखल केलेल्या चार्टशीटमध्ये या फोटोंचा समावेश करण्यात आला आहे.
देशमुख यांच्या ज्यावेळी हत्या करण्यात आली. तेव्हा काही आरोपींनी त्या घटनेचा व्हिडीओ काढला होता. हा व्हिडीओ सीआयडीच्या हाती लागला होता. त्याच व्हिडीओचे स्क्रिन शाँट घेऊन सीआयडीने या हत्याकांडाचे फोटो काढले. तेच फोटो कोर्टात दाखल केलेल्या चार्टशीटमध्ये जोडण्यात आले आहे. हे फोटो पाहिल्यानंतर अंगाचा थरकाप उडाल्याशिवाय राहत नाहीत.
सीआयडीने काढलेले फोटो अत्यंत भयंकर आहेत. संतोष देशमुख यांची हत्या किती क्रूरपणे केली गेली, याचा अंदाज हे फोटो पाहिल्यानंतर येतो. मानेवर पाय ठेवणे, दांडक्याने मारणे, मानेवर पाय ठेवणे असे प्रकार आरोपी करताना त्यात दिसत आहेत. संतोष देशमुख यांना उघडेही करण्यात आल्याचे दिसते. संतोष देशमुख यांना मारहाण करताना आरोपी निर्लज्जपणे खिदीखिदी हसतानाही दिसत आहेत. देशमुख यांचा पूर्ण चेहरा सुजलेला दिसत आहे. त्यांच्या चेहऱ्यावर लघ## करण्यात आली. ते गतप्राण पडले असतानाही त्यांना मारहाण सुरु आहे.



