खेळ

रोहित शर्मा लठ्ठ आणि कर्णधार म्हणून वाईट

टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्माच्या हेल्थवर टीका करुन महिला काँग्रेस नेत्या चांगल्याच अडचणीत सापडल्या आहेत. त्यांना सोशल मीडियावर तुफान ट्रोल केले जात आहे. 

एका खेळाडूला आवश्यक असलेल्या फिटनेसनुसार पाहायचे झाले तर हिटमॅन रोहित हा ओवर वेट आहे, असे काँग्रेस नेत्या शमा मोहम्मद म्हणाल्या. रोहितला वजन कमी करण्याची आवश्यकता आहे, असेही त्या म्हणाल्या.

गांगुली, तेंडुलकर, द्रविड, धोनी, कोहली, कपिल देव, शास्त्री यांसारख्या माजी कर्णधारांच्या तुलनेत रोहितमध्ये इतके जागतिक दर्जाचे काय आहे? तो एक सरासरी कर्णधार असण्यासोबतच एक सरासरी खेळाडू देखील आहे ज्याला भारताचा कर्णधार होण्याचा मान मिळाला, असेही त्या म्हणाल्या.

दरम्यान शमा यांना क्रिकेटप्रेमींनी चांगलेच ट्रोल केले. काहींनी रोहित शर्माची आकडेवारी सांगितली तर काहींनी कर्णधार म्हणून त्याचा रेकॉर्ड दाखवला. या सगळ्यात यावरुन भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

Related Articles

Back to top button