क्राईम

ब्रेकिंग! स्वारगेट अत्याचार प्रकरणातील दत्तात्रय गाडेला बेड्या

  • स्वारगेट स्थानकामधील शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आला. या घटनेनंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली. या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे हा अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. पोलिसांनी मध्यरात्री त्याच्या मुसक्या आवळल्या. अत्याचारानंतर गाडे फरार झाला होता. पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात होता. आरोपी सापडत नसल्याने पोलीस टीकेचे धनी झाले होते. शेवटी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. मोठ्या थरारानंतर रात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्याला पकडण्यात आले. गाडेला त्याच्या गुणाट या गावातून अटक करण्यात आली आहे.
  • पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाला होता. या प्रकरणातील आरोपी गाडे त्या दिवसापासून फरार झाला होता. पोलीस त्याचा शोध घेत होते परंतु तो काही हाती लागत नव्हता. त्याच्यावर एक लाखांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. दुसरीकडे पोलिसांचे पथक त्याचा शोध घेत होते. याच दरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की आरोपी गाडे हा गुणाट येथील ऊसाच्या शेतात लपून बसला आहे. पोलिसांनी ड्रोनच्या मदतीने त्याला हुडकून काढले. रात्रीच्या अंधारात त्याला शोधण्यात अडचणी येत होत्या. मात्र अनेक प्रयत्नानंतर अखेर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले.
  • अटक केल्यानंतर आज गाडेला कोर्टात हजर करण्यात येईल. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडू तब्बल 13 पथके तयार करण्यात आली होती.
  • गुणाट गावातही मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आरोपी सापडत नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जात होते. परंतु, पोलिसांनी त्याला शोधून काढण्यात कोणतीच कसर ठेवली नाही.

Related Articles

Back to top button