महाराष्ट्र

जयंत पाटील बावनकुळेंच्या भेटीला

  • ज्याच्या राजकारणात मध्यरात्री मोठी खलबतं झाली. लवकरच ज्येष्ठ नेते शरद पवारांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. मध्यरात्री भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या बंगल्यावर एक तास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि बावनकुळे यांची भेट झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. बावनकुळेंच्या बंगल्यावर एक तास ही बैठक झाली, अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे. पाटील आणि बावनकुळे यांच्या बैठकीच्या वेळी भाजपचे एक ज्येष्ठ मंत्री देखील उपस्थित होते, अशी माहिती मिळत
  • यावर आता पाटील यांची प्रतिक्रिया समोर आलीय. काल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी भेट झाली. परंतु ही भेट राजकीय नव्हती. आमची भेट 25 मिनिटं चालली. मतदारसंघातील अनेक प्रश्नांवर, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा झाली. जवळपास तेरा ते चौदा निवेदने झाली, असे पाटील म्हणाले.
  • दरम्यान मागील काही दिवसांपासून पाटील भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. राज्यात मोठ्या घडामोडी घडत असताना पाटील मात्र त्यावर कोणतीही प्रतिक्रिया देत नाहीत. विधानसभा निवडणुकीनंतर पाटील यांच्या प्रदेशाध्यक्षपदावर प्रश्न उपस्थित केला गेला होता, त्यामुळे पाटील नाराज असल्याची चर्चा देखील आहे.

Related Articles

Back to top button