क्राईम

ब्रेकिंग! 80 तोळे सोनं अन् 70 लाखांची कार हुंड्यात, तरी सासरी जाच

  • हुंड्याच्या लोभाने नवविवाहितेचा छळ केल्याची आणि त्यामुळे तिच्या आत्महत्येची धक्कादायक घटना घडली आहे. केवळ 27 वर्षांच्या रिधान्या नावाच्या तरुणीने सासरच्या छळाला कंटाळून रविवारी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
  • आत्महत्येपूर्वी तिने वडिलांना पाठवलेल्या हृदयस्पर्शी ऑडिओ मेसेजने समाजमन हादरले आहे. ही घटना तामिळनाडूमधील तिरुप्पूर जिल्ह्यात घडली आहे. 
  • रिधान्याचे लग्न एप्रिलमध्ये कविनकुमार या व्यावसायिकाशी थाटात पार पडले. लग्नात तब्बल 80 तोळे सोनं आणि 70 लाखांची व्हॉल्वो कार देण्यात आली होती. तरीही, रिधान्याला सासरकडून सतत मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत होता. 
  • रिधान्या आज मंदिरात जाण्याचे कारण सांगून घरातून बाहेर पडली. पण वाटेतच तिने गाडी थांबवून विष प्राशन केले. गाडी बराच वेळ एकाच ठिकाणी उभी असल्याचे लक्षात येताच स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिस घटनास्थळी पोहोचले असता ती मृतावस्थेत गाडीत आढळून आली.
  • आत्महत्येपूर्वी रिधान्याने आपल्या वडिलांना सात ऑडिओ मेसेज पाठवले. बाबा, मला तुमच्यावर ओझं व्हायचे नव्हते. हे जीवन मला नको आहे, असे ती म्हणाली. 
  • दरम्यान पोलिसांनी रिधान्याच्या आत्महत्येप्रकरणी पती कविनकुमार, सासरे ईश्वरमूर्ती आणि सासू चित्रादेवी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तिघांनाही अटक करण्यात आली आहे.

Related Articles

Back to top button