क्राईम
पहाटे कार चालकाला डुलकी लागली, अनर्थ घडला

- राज्यात झालेल्या भीषण कार अपघातात तीन मित्रांचा मृ्त्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी आहे. वर्ध्यातील सेलू येथे हा अपघात झाला आहे. नागपूर येथून वर्ध्याकडे जाताना या कारचा भीषण अपघात झाला. तुळजापूर – नागपूर मार्गावर सेलू येथे धानोली फाट्यावर घडली आहे.
- मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटेच्या सुमारास कार वेगात असताना चालकाला डुलकी लागली. त्यानंतर कार अनियंत्रित झाली आणि हा अपघात घडला. कार वेगात असताना अनियंत्रित झाल्याने रस्त्याच्या खाली उतरून तीन-चार वेळी उलटली आणि रस्त्याच्या खाली पडली.
- या अपघातानंतर दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर नागपूर येथे उपचाराला नेले जाते असताना तिसऱ्याचा मृत्यू झाला. आणखी एक जण जखमी झाला आहे. कारमधील सर्वजण वर्ध्याच्या सिंदी मेघे येथील रहिवाशी असल्याची माहिती आहे. मृतांमध्ये सुशील म्हस्के, शुभम कवडू मेश्राम, समीर सुटे यांचा समावेश आहे. तर धनराज धबर्डे असे जखमी युवकाचे नाव आहे.



