क्राईम

शिवसेना नेत्याला पाठलाग करत घातल्या गोळ्या

  • शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. ही घटना पंजाबच्या मोगा येथे घडली. मंगत राय असे त्यांचे नाव असून ते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते. ते गेली अनेक वर्ष शिवसेनेसाठी पंजाबमध्ये काम करत होते. काल रात्री दहा वाजता त्यांच्यावर रस्त्यावरून अचानक आलेल्या अज्ञातांनी हल्ला केला. त्या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
  • राय हे शिवसेनेसाठी गेल्या कित्येक वर्षापासून काम करत आहेत. त्यांच्यावर जिल्हा प्रमुखपदाचीही जबाबदारी देण्यात आली होती. त्यांची हत्या झाल्यानंतर पोलीसांना सुरूवातीला काही माहिती हाती लागली आहे. त्यानुसार मंगत हे रात्री दूध आणण्यासाठी घरा बाहेर पडले होते. त्याचवेळी तिथे तीन अज्ञात लोक बाईकवरून आले. त्यांनी मंगत यांच्यावर अंदाधूंद गोळीबार केला. फायरिंग इतकी जबरदस्त होती की, मंगत यांना हालचाल करण्याची संधीच मिळाली नाही.
  • गोळीबार केल्यानंतर आरोपी तिथून फरार झाले. याबाबतची माहिती स्थानिक पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस हे राय यांना रुग्णालयात घेऊन गेले. मात्र तोपर्यंत खूप उशिर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. या प्रकरणी पोलीसांनी आतापर्यंत अनेक लोकांची चौकशी केली आहे. त्याशिवाय या भागातली सीसीटीव्ही फुटेज ही पोलीस तपासत आहेत.

Related Articles

Back to top button