खेळ

हा तर मोठा गुन्हा! माफी मागावी, रोजा न ठेवल्याने मौलाना भडकले

  • भारतीय क्रिकेटर मोहम्मद शमीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात एनर्जी ड्रिंक घेतले होते. त्यावरुन मौलाना नाराज झाले होते. शमीने रमजानमध्ये रोजा ठेवला नाही, हा प्रकार शरीयतच्या नजरेत गुन्हा आहे, असे उत्तर प्रदेशातील बरेलीच्या मौलानांनी म्हटले होते. त्यानंतर सोशल मीडियावर या प्रकरणात गदारोळ सुरु आहे. आता मोहम्मद शमीचे समर्थन करण्यासाठी माजी कोच बदरुद्दीन स‍िद्दीकी आले आहेत.
  • स‍िद्दीकी यांनी म्हटले की, मोहम्मद शम्मी याचा या प्रकरणात दोष नाही. संपूर्ण देश त्याच्या पाठीशी आहे. देशापुढे काही नाही. ‘नेशन फस्ट’ हा संदेश सर्व मौलवींना मला द्यायचा आहे. तो रोजा नंतरही ठेवू शकतो. आमचा इस्लाम इतका लहान नाही की तो एका जागी संकुचित होऊ शकेल. इस्लाममध्ये असेही आहे की जर तुम्ही आजारी असाल तर तुम्ही नंतर रोजा ठेवू शकता. जे हा प्रश्न उपस्थित करत आहेत ते देशाचे समर्थन करत नाहीत. शमी देशासाठी काहीही करण्यास तयार आहे. अगदी रोजाही सोडत आहे. भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना खेळाणार आहे. त्यावेळी अशा विधानांमुळे खेळाडूंचे मनोबल खचेल. तुम्ही मूर्खपणाचे वक्तव्य करत आहात. तुम्हाला हे बोलण्याचा अधिकार कोणी दिले?

Related Articles

Back to top button