महाराष्ट्र

शिंदे गटात फडणवीसांचे 25 आमदार

  • आश्वासन देऊनही भाजपने निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपद न दिल्याने एकनाथ शिंदे मनाने कोलमडले असल्याचा गौप्यस्फोट शिंदेंच्या आमदाराच्या हवाल्याने केल्यानंतर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. शिंदे यांच्या गटात मुख्यमंत्री फडणवीस यांचे 20 ते 25 आमदार असल्याचे राऊत यांनी सांगितले.
  • राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले तरी सत्ता वाटपाचा घोळ सुरू होता. महायुतीचे सरकार असले तरी सगळे काही आलबेल नसल्याची चर्चा दबक्या आवाजात राजकीय वर्तुळात सुरू आहे. अशातच राऊत यांनी शिंदे गटातील आमदाराच्या हवाल्याने मोठा गौप्यस्फोट केला. आश्वासन देऊनही भाजपने निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपद न दिल्याने शिंदे हे मनाने कोलमडले असल्याचे राऊतांनी आमदाराच्या हवाल्याने सांगितले.
  • मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांच्यावर एक झोत होता. तो आता गेला आहे. लोक त्यांच्याकडे जात नाहीत. लोक फक्त पैसे मागायला जातात. यापुढील त्यांचे राजकारण पैसा आणि सत्ता जे आहे त्याच्यावर असून त्यांच्याच आमदारांमध्ये चलबिचल असल्याचे राऊतांनी सांगितले.
  • एका मोठ्या गटावर फडणवीस यांचे पूर्णपणे नियंत्रण असल्याचा दावा राऊतांनी केला. शिंदे गटाच्या किमान 20 ते 25 आमदारांच्या गटावर भाजपचे नियंत्रण आहे. हे आमदार फडणवीस किंवा अमित शहा यांच्या सांगण्यावरून सुरतला गेले होते. शिंदे यांच्यासाठी नव्हते गेले. आजही या गटावर फडणवीस यांचे नियंत्रण आहे. तर उरलेल्या आमदारांमध्ये चलबिचल आहे. आपण पुन्हा मागे फिरायचे का असा एक विचार शिंदे गटात सुरू असल्याचा दावा राऊत यांनी केला.

Related Articles

Back to top button