महाराष्ट्र
राज्यात घडामोडींना वेग

- राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव करत महायुतीने पुन्हा एकदा सत्तेवर दावा केला. महायुतीच्या या लाटेत मविआचा धुव्वा उडाला. एकेकाळी महाराष्ट्रात निर्विवाद सत्ता असणाऱ्या काँग्रेसला केवळ 16 जागांवर समाधान मानावे लागले. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज फोन करुन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. शिंदे साताऱ्यातील दरे गावात गेल्यानंतर ते आजारी पडले. त्यानंतर आज फडणवीसांनी फोन करुन त्यांची विचारणा केली. दरम्यान, शिंदे गेल्या तीन दिवसांपासून दरेगावी मुक्कामी असून आज ते ठाण्यासाठी रवाना होणार आहेत.
- महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. मात्र, महाराष्ट्राच्या 31 व्या मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळा पाच डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
- फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असा अंदाज राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत. तर, दिल्लीच्या बैठकीत फडणवीस यांचेच नाव निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती आहे.