ब्रेकिंग! लाडकी बहीण योजनेबद्दल अजितदादांची मोठी कबुली

Admin
1 Min Read
  • विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना ही गेमचेंजर ठरली. महायुती सरकारला यंदाच्या निवडणुकीत या योजनेमुळे मोठे यश मिळाले. विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर काही दिवसांपूर्वी या योजनेचे उर्वरित पैसे मिळाले. विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा सत्ता मिळाली, तर या योजनेचे पैसे वाढवून 2100 रुपये करू, असे आश्वासन महायुतीच्या नेत्यांकडून देण्यात आले. आता या योजनेबद्दल उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी मोठी कबुली दिली आहे.
  • गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकार लाडक्या बहि‍णींना दिलेली रक्कम परत घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या योजनेचे पैसे परत घेतले जाणार का? असा प्रश्न अनेक महिलांना पडला आहे. त्यातच आता अजितदादा यांनी या याजनेतील लाभार्थी महिलांना दिलेले पैसे परत घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
  • लाडकी बहीण योजना लागू केली, तेव्हा आमच्याकडे मर्यादित वेळ होता. त्यामुळे आम्हाला बहि‍णींचे आधार कार्ड लिंक करता आले नाहीत. पण आता आम्ही खरोखर ज्या लाडक्या बहिणी आहेत, ज्यांना याचा लाभ मिळणे आवश्यक आहे, त्यादृष्टीने आम्ही पावले उचलत आहोत, असे अजितदादा म्हणाले.
Share This Article