मोठी बातमी! बांगलादेशी महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ
राज्यात सध्या मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी घुसखोर असल्याची चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर बांगलादेशी घुसखोरांची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेण्याची मोहीम पोलीस राबवत आहेत. दरम्यान एक खळबळजनक घटना समोर आली आहे. अशाच एका घुसखोर महिलेला चक्क लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे.
मुंबईतील नागपाडा कामाठीपुरा येथून अटक केलेल्या संशयित बांगलादेशी महिला घुसखोरांपैकी एकाने लाडकी बहीण योजनेचा फायदा घेतला. तिच्या खात्यात या योजनेचे दोन हप्ते जमा झालेले आहेत. अटक केलेल्या बांगलादेशी महिलेने विधानसभा निवडणुकीतही मतदान केल्याचे उघड झाले आहे.
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने कामाठीपुरा येथे छापा टाकून दोन पुरुष आणि तीन महिलांसह पाच जणांना अटक केली. त्यापैकी एक भारतीय पुरूष आणि तीन महिला आहेत. गुन्हे शाखेने म्हटले आहे की, ही महिला बांगलादेशी नागरिक आहे. तिने बांगलादेशी एजंटमार्फत भारतात घुसखोरी केली होती. त्याचे नाव यादव असल्याचे या महिलेने सांगितले आहे. त्याने मुंबईत तिच्या राहण्याची व्यवस्था केली होती.