क्राईम
आफताब देतोय तुकडे करुन ठार मारण्याची धमकी…; दोन वर्षांपूर्वीच श्रद्धाने केली होती तक्रार

देशाला हादरवून टाकणाऱ्या श्रद्धा हत्या प्रकरणात एक मोठा खुलासा झाला असून २०२० सालीच श्रद्धाने आफताबविरोधात वसई येथील तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचे समोर आले आहे. श्रद्धाने तक्रारीत आफताबपासून जीवाला धोका असल्याचे म्हटले होते.आफताब आपल्याला शरीराचे तुकडे करुन फेकून देईन, अशा धमक्या देत असल्याचा आरोप श्रद्धाने केला होता. पोलिसांनी वेळीच श्रद्धाच्या तक्रारीची दखल घेत आफताबवर कारवाई केली असती तर आज ती जिवंत असती अशा प्रतिक्रिया यूजर्स देत आहेत. आफताब गेल्या सहा महिन्यांपासून आपल्याला शिवीगाळ आणि मारहाण करत आहे.