सोलापूर
ब्रेकिंग! सोलापुरात चालत्या ट्रेनमध्ये धाडसी दरोडा

सोलापुरात हल्ली चोरीचे प्रमाण वाढले आहे. असाच काहीसा प्रकार काल रात्री घडला आहे. भावनगर ते काकीनाडा एक्सप्रेसमध्ये धाडसी दरोडा टाकण्यात आला आहे. ही घटना काल रात्री आठ वाजल्याच्या सुमारास मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ स्टेशन जवळ घडली आहे.
भावनगर ते काकीनाडा एक्सप्रेस नेहमीप्रमाणे सुटली होती. दरम्यान दौंडमध्ये थांबा घेतल्यानंतर ही गाडी थेट सोलापुरातच थांबणार होती. यामुळे सर्व प्रवासी आराम करत होते. दरम्यान सोलापूर हद्दीतील मलिकपेठ स्टेशनच्या जवळ येतात या गाडीचा वेग कमी झाला. याच संधीचा दरोडेखोरांनी फायदा घेतला.
झोपेत असलेल्या प्रवाशांना त्यांनी दमदाटी केली. तसेच त्यांच्या अंगावरील दागिने ओरबडून घेण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार या एक्सप्रेसच्या एस सहा, एस सात, एस एक या कोचमध्ये घडल्याची माहिती आहे. या दरोड्यामध्ये दरोडेखोरांनी प्रवाशांच्या सोने-चांदीचे दागिने लुटले. ही एक्सप्रेस सोलापूर रेल्वे स्थानकावर आल्यानंतर याबाबत लोहमार्ग पोलिसांना याची माहिती देण्यात आली. याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.