क्राईम

ब्रेकिंग! दोन कोटी रुपये द्या, अन्यथा तुमचे हातपाय तोडू

  • मस्साजोग येथील आवादा या पवनऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्याला खंडणी दोन मागितल्याप्रकरणी वाल्मिक कराड पोलिस कोठडीत आहे. सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातही वाल्मिक कराडचा सहभागअसल्याचे बोलले जात आहे. 
  • पण, आता वाल्मिकचा पाय आणखी खोलात गेला आहे. वाल्मिकने अधिकाऱ्याला धमकी दिल्याचे कॉल रेकॉर्डिंग आता ‘सीआयडी’च्या हाती लागले आहे. आवाजाची तपासणी सुरू झाली आहे.
  • सुनील केदू शिंदे ( 42, रा. नाशिक मु. बीड ) हे आवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत प्रकल्प अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्याकडे केज तालुक्यातील विविध ठिकाणी पवन ऊर्जा प्रकल्पाची मांडणी आणि उभारणीचे काम आहे.
  • 29 नोव्हेंबरला शिंदे यांच्या मोबाइलवर विष्णू चाटे याने फोन केला. वाल्मिक अण्णा बोलणार आहेत, चाटेने सांगितले. ज्या परिस्थितीत सुदर्शननं सांगितलं आहे, त्या परिस्थितीत काम बंद करा, अन्यथा त्याचे परिणाम गंभीर होतील, काम चालू केले तर याद राखा, असे म्हणून काम बंद करण्याची धमकी वाल्मिकने दिली. त्याच दिवशी घुले आवादाच्या कार्यालयात आला.
  • काम बंद करा, अन्यथा तुमचे हातपाय तोडू. काम चालू ठेवायचे असेल, तर दोन कोटी रुपये द्या, असा दमही वाल्मिकने शिंदेंना दिला होता. याचे सर्व कॉल रेकॉर्डिंग शिंदेंच्या मोबाइलमध्ये झाले आहे. त्यावरून गुन्हा दाखल झाला होता. हेच रेकॉर्डिंग सीआयडी’च्या हाती लागले आहे. तो आवाज कराड, चाटे यांचाच आहे का? यासाठी व्हाइस स्पॅम्पल घेतले जात आहेत

Related Articles

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa