महाराष्ट्र

राजकीय डाव खेळणारे शरद पवार स्वतः अडकले धर्मसंकटात?

  • विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात सर्वकाही ओके नसल्याचे सांगण्यात येत आहे. पक्षांतर्गत प्रदेशाध्यक्ष बदल्यात यावा, अशी मागणी काही जणांकडून करण्यात येत आहे. तर आता विधानसभानिवडणुकीत प्रत्येकाने आपल्या वॉर्डात पक्षाला किती मतं दिली त्याचा डेटा पुढील दोन दिवसात द्या, आठ दिवसात स्वतःहून प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देतो, असे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. तसेच पक्ष चालवणं हे काही सोपं काम नाही, सगळ्यांना एकत्र घेऊन काम करावं लागलं, असंही ते म्हणाले.
  • समोर आलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीत काही कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष बदलावा, अशी मागणी केली होती त्यावर पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

Related Articles

Back to top button