
सोलापूर (प्रतिनिधी) डॉक्टर आहे असे सांगून विश्वास संपादन करून वेळोवेळी फिर्यादीच्या घरी येऊन रोख रक्कम व खात्यावरून पैसे ट्रान्सफर करून घेऊन ते पैसे सरकारी योजनेत व रिझर्व बँकेत गुंतवणूक करतो असे सांगून वेळोवेळी ५१ लाख २७ हजार रुपये घेऊन विश्वासघात करून फिर्यादीची आर्थिक फसवणूक केल्याची घटना २०१४ ते २८ जुन २०२४ दरम्यान लक्ष्मी पेठ, देगाव रोड सोलापूर येथे घडली.
याप्रकरणी मीना साताप्पा साबळे (वय-६८,रा- लक्ष्मी पेठ,देगाव रोड) यांच्या फिर्यादीवरून विशाल दत्तात्रय बनसोडे (वय-३६,रा- सावित्रीबाई फुले हाउसिंग सोसायटी,संभाजीनगर,ता- जयसिंगपूर, जिल्हा कोल्हापूर) यांच्याविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.या घटनेचा पुढील तपास सपोनि.जाधव करीत आहेत.



