भाजपचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी रविंद्र चव्हाण यांनी महाविकास आघाडीला इशारा दिला आहे. जळगावात महावितरणकडून घरोघरी पाठविलेल्या विज बिलावर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा फोटो असल्याची माहिती समोर येत आहे. त्यावर ठाकरे गट आणि भाजप यांच्यात वाद सुरू झाल्याचे पाहायाला मिळत आहे. या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
महावितरणावरील बिलावर छापलेल्या फोटोवरून चव्हाण यांनी उद्धव ठाकरे यांनी इशारा दिला. हे जर चुकून झाले असेल तर ठिक आहे. पण हे योग्य नाही. मात्र, हेतू पुरस्पर या गोष्टी होत असतील तर त्यावर नक्कीच कारवाई केली जाईल, असे म्हणत चव्हाण यांनी ठाकरेंना इशारा दिला आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून याचे पडसाद राज्यात उमटू लागले आहेत.
दरम्यान 2022 साली माजी मुख्यमंत्री ठाकरे हे मुख्यमंत्री पदावरुन पायऊतार झाले. त्यानंतर शिवसेनेतील बंडामुळे राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले. त्यावेळी मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान झाले होते. त्यानंतर अलीकडे मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले असून राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आले आहे. तसेच आता मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हे विराजमान झाले आहेत. असे असताना जळगाव येथील या घटनेने खळबळ उडवून दिली आहे.
जळगावात महावितरणकडून ग्राहकांना विज बिलाचे वितरण करण्यात आले आहे. या बिलांवर मुख्यमंत्री म्हणून आजही उद्धव यांचा फोटो छापण्यात येत आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनादेखील यामुळे शॉक बसला आहे.