क्राईम
ब्रेकिंग! आरोपींनी संतोष देशमुख यांचा खून एन्जॉय केला?

- सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी सुर्दशन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांना पोलिसांनी पुण्यातील बालेवाडी येथे अटक केली आहे. देशमुख यांची हत्या झाल्यापासून सुर्दशन, सुधीर आणि कृष्णा आंधळे हे तिघे मारेकरी फरार होते. त्यामधील दोघांना आज पुण्यातील बालेवाडीमधील एका खोलीतून पोलिसांनी अटक केली आहे. तर, कृष्णा आंधाळे हे अद्यापही फरार आहे. सुर्दशन आणि सुधीरला अटक केल्यानंतर या दोघांना केजमधील कोर्टात नेण्यात आले. दरम्यान, आरोपींना 15 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
- दरम्यान आरोपींना संतोष देशमुख यांच्या हत्येचा अजिबात पश्चाताप नाही. संतोष देशमुख यांचा खून यांनी एन्जॉय केला आहे. या आरोपींना आता आळा घालणं गरजेचं आहे, त्यामुळे तपासासाठी आरोपींना 15 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी, असा युक्तीवाद कोर्टात करण्यात आला आहे.



