ब्रेकिंग! सोलापुरात दहशत

सोलापूर (प्रतिनिधी) चार चाकी गाडीला हात केलेल्या इसमाकडुन रोख रक्कम, मोबाईल, मनगटी घड्याळ, अंगठी व फोन पे द्वारे पैसे ट्रांजेक्शन करून पैसे काढून घेतल्याची घटना १ जानेवारी रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास गेंट्याल चौक येथे घडली.
याप्रकरणी सिद्धाराम धोंडप्पा बरगुडे (वय-४९,रा.संतोष माळी यांच्या घरात भाड्याने, माळीनगर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून चिट्या व वमश्या या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
या घटनेची थोडक्यात हकीकत अशी की,फिर्यादी हे रात्री घरी जाण्याकरिता गेंट्याल चौकातून जात असताना पाठीमागून येणाऱ्या काळ्या रंगाच्या चार चाकी वाहनास हात केला.त्यावेळी ती कार थांबली व त्या गाडीत अंदाजे २१ ते २५ वय असलेले वरील दोन इसम होते.ते एकमेकांच्या नावाने हाक मारून त्यातील एकाने फिर्यादीस मारहाण करून जबरदस्तीने वरील मुद्देमाल काढून घेतला व मोबाईल मधून ऑनलाईन ट्रांजेक्शनद्वारे पैसे काढून घेतले आहे. असे फिर्यादीत नमूद आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चंदनशिवे हे करीत आहेत.