क्राईम
अखेर त्याने तोंड उघडले…

- मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने राज्यात गदारोळ झाला आहे. कारण पवनचक्की खंडणी प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याच्या अडचणीत देखील आता मोठी वाढ झाली आहे. चाटे याने एक खळबळजनक माहिती दिली आहे. वाल्मिक कराडने खंडणीसाठी पवन ऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधल्याची थेट कबुली चाटे याने दिली आहे.
- देशमुख हत्या प्रकरणासह पवनऊर्जा कंपनीकडून दोन कोटींची खंडणी उकळण्याच्या प्रकरणात चाटे हा आरोपी पोलिस कोठडीत आहे. पोलीस कोठडीत चाटे याची कसून चौकशी सुरू आहे. कारण या चौकशीत चाटे याने वाल्मिकने माझ्या फोनवरून पवन ऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी खंडणीसंदर्भात बोलणी केल्याची थेट कबुली दिली आहे.
- सर्वात महत्वाचे म्हणजे आता या प्रकरणाचा तपास करणाऱ्या गुन्हे अन्वेषण विभागाने कोर्टात सादर केलेल्या प्राथमिक अहवालाद्वारे हा धक्कादायक खुलासा झाला आहे. त्यामुळे आता वाल्मिकच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
- चाटे याने दिलेल्या कबुलीत म्हटले आहे की, वाल्मिकने पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत फोनवर संभाषण केले. त्यावेळी वाल्मिकने आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे तब्बल दोन कोटींची खंडणी मागितली होती.



