राजकीय

ब्रेकिंग! शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा राजीनामा

  • राज्याच्या राजकारणात आज एक मोठी उलथापालथ झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी शशिकांत शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्याची अधिकृत घोषणाही पक्षाकडून करण्यात आली आहे.
  • या घडामोडीमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही रणनीती म्हणून पाहिली जात आहे.
  • पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदावर होते. त्यांनी अनेक निवडणुका पक्षाच्या नेतृत्वाखाली लढवल्या आहेत. मात्र, सध्या पक्षात नव्या दमाच्या नेतृत्वाची गरज असल्याने, त्यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
  • शशिकांत शिंदे हेही अनुभवी आमदार असून ग्रामीण महाराष्ट्रात त्यांची मजबूत पकड आहे. त्यामुळे पक्ष संघटना बळकट करण्यासाठी त्यांच्या निवडीला प्राधान्य देण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button