देश - विदेश
युक्रेनचा रशियावर मोठा हल्ला

- मागील दोन वर्षांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध सुरु आहे. कधी बॉम्बहल्ला, कधी मिसाईल हल्ला तर कधी सैन्याचा शिरकाव करून रशियाकडून सातत्याने युक्रेनवर हल्ला केला जात आहे. दुसरीकडे, युक्रेन देखील रशियाच्या हल्लाला जुमानत नाही, त्यांनी देखील तोडीस तोड देऊन पलटवार करणे सुरूच ठेवले आहे. अशातच युक्रेनने अतिशय नव्या पद्धतीने रशियाच्या हवाई तळांवर निशाणा साधला. तर करोडो रुपयांचे बॉम्बर्स, हवाई जेट नष्ट केल्याचे सांगितले जात आहे.
- युक्रेनने काल ‘ऑपरेशन स्पायडरवेब’ द्वारे रशियन लष्करी विमानतळांवर जोरदार हल्ला चढवला. या हल्ल्यात चाळीसहून अधिक बॉम्बर्सना नष्ट केल्याचा दावा केला जात आहे. परंतु, युक्रेनने यासाठी कोणतेही मोठे यश किंवा जेट वापरले नाही. त्यासाठी अतिशय स्वस्त किमतीत मिळणारे FPV ड्रोनचा वापर केल्याचे समोर आले आहे. ज्याने, महागडी रशियन विमाने नष्ट केली.
- काल झालेल्या हल्ल्यात शेकडो FPV ड्रोन रशियन हवाई तळांवर घुसले आणि तेथे उभ्या असलेल्या बॉम्बर्सना नष्ट केले. रशियाच्या प्रगत हवाई संरक्षण प्रणाली असूनही अशा हल्ल्यांना रोखणे आव्हानात्मक ठरले आहे.
- लक्ष्यित हवाई तळांमध्ये एंगेल्स एअरबेस, शैकोव्हका, मोजदोक, इंगोशेतियाचा लष्करी प्रदेश आणि ओरेल एअरफील्ड यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. या तळांमध्ये Tu-95 आणि Tu-22M3 सारखे बॉम्बर्स होते, ज्यांचा वापर रशियाने युक्रेनवर क्षेपणास्त्र हल्ल्यांसाठी केला होता. परंतु, आता युक्रेनने त्यांच्या नवीन तंज्ञाचा वापर करून हल्ला केला.



