सोलापूर

अभिनेत्रीच्या भरधाव कारने मजुरांना उडवले

  • मराठी अभिनेत्री उर्मिला कोठारे हिच्या कारचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईतील कांदिवली परिसरातील पोईसर मेट्रो स्टेशनजवळ ही घटना घडली. 
  • या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याचे समजते. शिवाय, कारमध्ये प्रवास करत असलेली उर्मिला आणि कार चालक दोघेही जखमी असल्याची माहिती समोर येत आहे.
  • शुटींग संपवून घरी परतत असताना उर्मिलाच्या कारचा हा अपघात झाला. या अपघातात उर्मिला गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. विशेष म्हणजे गाडीची एअर बॅग योग्य वेळी उघडल्याने उर्मिलाचा जीव वाचला. 
  • तरीही तिच्या कारचा मात्र चक्काचुर झाला आहे. हा अपघात कांदिवली परिसरातील पोईसर मेट्रो स्टेशनजवळ झाला असून, मेट्रोमध्ये काम करणाऱ्या दोन मजुरांना भरधाव कारने धडक दिली, या घटनेत एका मजुराचा मृत्यू झाला, तर दुसरा मजूर गंभीर जखमी झाला.
  • या अपघाताच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उर्मिलाच्या कारचा वेग जास्त होता. त्यामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव वेगाने जात असलेल्या कारने रस्त्याच्या कडेला काम करणाऱ्या दोन मेट्रो कर्मचाऱ्यांना धडक दिली. तसेच, या प्रकरणी समतानगर पोलिसांनी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Related Articles

Back to top button