महाराष्ट्र

बाबासाहेबांचा अपमान! अमित शहांचा अर्धवट व्हिडिओ काँग्रेसकडून ट्विट

  • केंद्रीयमंत्री अमित शहा यांचा अर्धवट व्हिडिओ काँग्रेसकडून ट्विट करुन आधी संसदेचा आणि आता जनतेचा वेळ वाया घालत असल्याचे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहांच्या विधानावर दुसरी बाजू मांडली. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात संविधानाच्या चर्चेदरम्यान अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत अपमानजनक विधान केल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. या मुद्द्यावरुन देशभरात शहांच्या विरोधात आंदोलने करण्यात येत आहेत. अशातच आज नागपुरातून माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी भाष्य केले.
  • फडणवीस म्हणाले, काँग्रेस अमित शहा यांच्या विधानाबाबतचा अर्धवट व्हिडिओ ट्विट करुन संसदेचा आणि जनतेचा वेळ वाया घालत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत बोलत होते. काँग्रेसने बाबासाहेबांना कसा विरोध केला, हे ते यावेळी सांगत होते. डॉ. आंबेडकरांना आणि आरक्षणाला गांधी-नेहरु कुटुंबाचा विरोध राहिल्याचे पुरावे मोदींनी संसदेत समोर आणले, तेव्हा आता काँग्रेसकडून हे नाटक सुरु असल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केले.
  • केंद्रीयमंत्री अमित शहा यांचा अर्धवट व्हिडिओ ट्विट करुन काँग्रेसने संसदेचा वेळ खराब केला आहे. आता ते जनतेचा वेळ खराब करीत आहेत. संसदेत बोलताना मोदींनी काँग्रेबाबत विधान केले, बाबासाहेबांना आणि आरक्षणाला नेहरु-गांधी घराण्याचा कसा विरोध राहिला, हे पुराव्यासहित मोदींनी जगासमोर आणले. तेव्हा काँग्रेस आता नाटक करण्याचे काम करीत असल्याचे फडणवीसांनी सांगितले.

Related Articles

Back to top button