संजय राऊतांचे फडणवीसांना ओपन चॅलेंज
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली. तसेच माजी मंत्री छगन भुजबळ यांची नाराजी आणि परभणी, बीड येथील घटनांचा उल्लेख करत फडणवीसांना चॅलेंजही दिले. आपण भुजबळांना मंत्रिमंडळातून दूर करू शकता. पण ज्याच्यावर एका खूनाच्या कटकारस्थानाचा संशय आहे, अशा व्यक्तींना दूर ठेऊ शकत नाही. आम्हाला खोटे गुन्हे दाखल करून अटक कराल. देवेंद्रजी तुमच्यात हिंमत असेल तर बीडमधील खऱ्या आरोपींनी पकडून दाखवा, असे आव्हान राऊतांनी दिले.
राऊत पुढे म्हणाले, या देशामध्ये विरोधी पक्षाने, जनतेने, नागरिकाने काय करावे, कुठे जावे, काय बोलावे, काय खावे, कोणत्या भूमिका मांडाव्यात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, फडणवीस ठरवणार का ? या देशात लोकशाही आहे. महाराष्ट्राची परिस्थिती बिहारपेक्षा गंभीर आहे हे फडणवीस यांनी समजून घ्यावे. मिस्टर फडणवीस बीड आणि परभणी संदर्भात ज्यांच्यावर लोकांचा संशय आहे, रोष आहे अशी लोक आपल्या मंत्रिमंडळात आहेत. आपण त्यांना घेतले आहे. न्यायाच्या गोष्टी करत आहात. स्वतः एकदा बीडला जा. गृहमंत्री म्हणून गेलात का एकदा बीडला ? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.