महाराष्ट्र

ब्रेकिंग! तीन महिन्यात पुन्हा निवडणुका?

राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या असून सर्वांना आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. दरम्यान, आता पुढील तीन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. नागपूरमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात संकेत दिले आहेत.

मागील पावणेतीन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालात अनेक याचिका दाखल झालेल्या आहेत. त्या याचिकांवरील सुनावणीची सर्वांना प्रतीक्षा आहे. येत्या चार जानेवारी रोजी या याचिकांवर सुनावणी होणार असल्याची शक्यता आहे. तर आगामी तीन महिन्यांतच या निवडणुका घेण्याचे प्रयत्न असल्याचे वक्तव्य फडणवीस यांनी केले आहे.

राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचा दणक्यात विजय झाला. त्यानंतर आता भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. नागपुरमध्ये भाजप कार्यकर्त्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ‘मन की बात’ मांडली. विधानसभा निवडणुकीतील विजयामुळे भाजपसाठी फेव्हरेबल वातावरण आहे. याचा फायदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये होईल, असे नियोजन पक्षाकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button