मनोरंजन
पंतप्रधान ‘छावा’चे कौतुक करतात आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा आणि वारशाचा सन्मान करतात हा अभिमानाचा क्षण…

- छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित ‘छावा’ चित्रपटाने भारतात २२५ कोटींहून अधिक कमाई केली. कमाईचा हाच आकडा जगभराचा विचार केला तर ३०० कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आता या चित्रपटाचे कौतुक केले आहे.
- मोदी यांनी कौतूक केल्यानंतर आता अभिनेता विकी कौशलनेही पंतप्रधानांचे आभार मानले आहे. हा सन्मान शब्दांपलीकडचा आहे, असे त्याने म्हटले आहे.
- मोदी यांनी शुक्रवारी नवी दिल्ली येथे ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन केले. कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाचे कौतुक केले. या चित्रपटाबद्दल देशभरात सुरू असलेल्या चर्चेवर पंतप्रधान म्हणाले, आजकाल ‘छावा’ हा चित्रपट खूपच लोकप्रिय झाला आहे. महाराष्ट्र आणि मुंबईने मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीला नवीन उंची दिली आहे. ‘छावा’ हा चित्रपट प्रसिद्ध होत आहे. शिवाजी सावंत यांच्या मराठी कादंबरीत वर्णन केलेले छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य चित्रपटाच्या स्वरूपात सादर केले आहे.
- मोदी यांच्या कौतुकानंतर अभिनेता विकी कौशलने शब्दों से परे सम्मान! पीएम नरेंद्र मोदी आपका आभार, असे म्हणत एक पोस्ट शेअर केली. मॅडॉक फिल्म्सनेही मोदींचे आभार मानले. इंस्टाग्रामवरील पोस्टसोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, एक ऐतिहासिक सन्मान! पंतप्रधान मोदी ‘छावा’चे कौतुक करतात आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा आणि वारशाचा सन्मान करतात हा अभिमानाचा क्षण आहे. हा क्षण आपल्याला कृतज्ञतेने भरून टाकतो. मॅडॉक फिल्म्स, दिनेश विजन, लक्ष्मण उतेकर, विकी कौशल आणि चित्रपटाची संपूर्ण टीम या विशेष उल्लेखाने भारावून गेली आहे.