क्राईम
आम्ही कुणाला भीत नाय, तुला खल्लासच करतो

- बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा क्रूर मारहाणीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंबाजोगाई येथे एका दलित तरुणाला अत्यंत अमानुषपणे मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मारहाण करणाऱ्या आरोपींनी त्याचे पैसे आणि मोबाईल हिसकावले असून, तुला खल्लासच करतो असे म्हणत त्याला मारहाण केली.
- मागील काही दिवसांपासून बीड जिल्हा हिंसाचाराच्या घटनांमुळे चर्चेत आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी आणि त्यानंतर झालेल्या विविध मारहाणीच्या घटनांनी जिल्ह्यात तणाव वाढला आहे. गेल्या काही दिवसांत जिल्ह्यातील अनेक मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. अशात आता हा नवीन व्हिडिओ समोर आला आहे.
- अंबाजोगाईतील या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा साळे या दलित तरुणाला जबर मारहाण करण्यात आली आहे. तसेच त्याच्याकडून पैसे आणि मोबाईल देखील लुटला गेला. धक्कादायक म्हणजे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास विलंब केला, असा आरोपही केला जात आहे.
- या व्हायरल व्हिडीओमध्ये चार आरोपी मिळून या तरुणाला निर्दयपणे मारहाण करत आहेत. कोणी डोक्यात, पाठीवर, पायावर, पोटात आणि मानेवर मारत असल्याचे स्पष्ट दिसते.
- तसेच आरोपींचे चेहरेही स्पष्ट ओळखू येतात. या व्हायरल व्हिडिओनंतर ऑल इंडिया पॅंथर सेनाने मोठी मागणी केली. सर्व आरोपींना तातडीने अटक करावी तसेच आरोपींना पाठीशी घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.



