महाराष्ट्र
ब्रेकिंग! डिसेंबरच्या शेवटी राज्यात मोठा राजकीय भूकंप?

- काल मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील 43 जागांपैकी 42 जागांवर कोण मंत्री असतील हे निश्चित झाले आहे. मात्र, मंत्रिमंडळातील एक जागा रिक्त ठेवण्यात आली असून या जागेबद्दलचे गूढ कायम असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरींनी ही रिक्त जागा कोणासाठी आहे याबद्दलचे थक्क करणारे विधान केले आहे. मिटकरींनी व्यक्त केलेले भाकित खरे असेल तर तो ज्येष्ठ नेते शरद पवारांसाठी सर्वात मोठा धक्का ठरेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
- मिटकरींना, एक मंत्रिपद खाली ठेवले आहे. ते नेमके कोणासाठी आहे? जयंत पाटलांसाठी आहे की कोणासाठी आहे? असा प्रश्न पत्रकाराने विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना मिटकरींनी राज्यात राजकीय भूकंप होईल अशा अर्थाचे भाकित केले आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासाठी ही जागा खाली ठेवल्याचे मत व्यक्त केले आहे. मागेही एक मंत्रिपद त्यांच्यासाठीच खाली ठेवले होते. त्यांनी त्यावेळेस फार विचार केला. नंतरच्या काळात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला बहुमत मिळाले. त्यांना असे वाटले की, आपल्याला तिथे जाण्याची गरज नाही. पण आता अशी परिस्थिती आहे की मला असे वाटते की ते जे बोललेत ना योग्य व्यक्ती, योग्य वेळ, योग्य निर्णय घेतील. तुम्ही बघा आता. वन डाऊनला जो प्लेअर येतो, ना त्या प्लेअरसाठी ठेवलेली आहे, असे उत्तर मिटकरींनी दिले.