महाराष्ट्र
ब्रेकिंग! महायुती सरकारचे खातेवाटप कधी?
- मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर आता खातेवाटप कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. याबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. दुसरीकडे खातेवाटप पुढील दोन ते तीन दिवसात होणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुती सरकारच्यावतीने पत्रकार परिषद घेण्यात आली होती. यावेळी अजितदादा बोलत होते.
- विरोधक जरी संख्येने कमी असले तरी देखील महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाचे प्रश्न आले तर त्यांची उत्तरे दिले जातील. आम्हाला प्रचंड बहुमत आहे त्यामुळे सभागृह रेटून आम्ही चालवणार नाही, असे अजितदादा म्हणाले.
- आज मंत्रिमंडळाला अंतिम स्वरूप मिळाला आहे. पुढील दोन तीन दिवसात मुख्यमंत्री सर्वांना खाते वाटप करतील आणि आमचे सरकार जनतेच्या विश्वासाला पात्र राहिल, असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी बोलताना दिले.