महाराष्ट्र
ब्रेकिंग! मंत्रिमंडळात किती लाडक्या बहिणींना मिळाले स्थान
- देवेंद्र फडणवीसांच्या नवीन मंत्रिमंडळात चार लाडक्या बहिणींना संधी देण्यात आली आहे. यामध्ये भाजपच्या तीन महिला आमदारांचा समावेश आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका महिला आमदाराचा समावेश आहे. शिंदे शिवसेनेने एकाही महिलेला संधी दिलेली नाही.
- भाजपकडून पंकजा मुंडे, मेघना बोर्डीकर आणि माधुरी मिसाळ यांना मंत्रिमंडळामध्ये संधी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने अदिती तटकरे यांना मंत्री मंडळात संधी दिली आहे. मागील मंत्री मंडळात सुद्धा त्यांची वर्णी लागली होती. तर दुसरीकडे शिंदे यांच्या शिवसेनेने आतापर्यंत 12 जणांच्या नावाची यादी जाहीर केली आहे. त्यात एका ही लाडक्या बहिणीला संधी देण्यात आली नसल्याचे दिसून येते.
- या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या 20 महिला या विजयी झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक संख्या भाजपाकडे आहे. भाजपाच्या 14, शिवसेनेच्या 2 तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या 4 महिला आमदार आहेत.