महाराष्ट्र

भाजपकडून पुन्हा धक्कातंत्र, बावनकुळे मंत्री होणार?

अलीकडे पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा शपथविधी पार पडला. मात्र, सरकार स्थापन होऊन दहा दिवस उलटले तरी फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तार झाला नाही. आज नागपुरात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. नागपुरातील राजभवनातील लॉनमध्ये हा शपथविधी सोहळा रंगणार आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 21 दिवस झाल्यानंतर आता महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लागला आहे. भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्यामुळे आता भाजपला नवीन प्रदेशाध्यक्ष मिळणार आहेत. भाजपच्या पक्षांतर्गत नियमानुसार बावनकुळे आता प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे अन्य नेत्याकडे सोपवणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी विरोधक असणारे रविंद्र चव्हाण भाजपचे प्रदेशाध्यक्ष होणार आहेत.

चव्हाण हे ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीचे आमदार म्हणून विजयी झाले आहेत. मागील महायुतीच्या सरकारमध्ये ते मंत्री होते. यंदाही मंत्री म्हणून त्यांचे नाव आघाडीवर होते.

आता चव्हाणांकडे भाजप नवी जबाबदारी सोपवणार असल्याची माहिती आहे. चव्हाण यांच्याकडे मोठी जबाबदारी असणार आहे. पुढील विधानसभा निवडणुकीत 2029 मध्ये भाजपला दोनशेहून अधिक आमदार निवडून आणायचे आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवडणूक प्रचार सभेत 2029 च्या निवडणुकीत भाजपला स्वबळावर सत्ता स्थापन करायची असल्याचे म्हटले होते. त्यादृष्टीने भाजप कामाला लागली आहे.

Related Articles

Back to top button