ब्रेकिंग! अखेर भाजप आमदारांचे फोन खणखणले

अलीकडे पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा शपथविधी पार पडला. मात्र, सरकार स्थापन होऊन दहा दिवस उलटले तरी फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तार झाला नाही. आज नागपुरात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. त्यापार्श्वभूमीवर भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसकडून नेत्यांना मंत्रिपदासाठी फोन यायला सुरुवात झाली आहे.
मंत्रिमंडळात यंदा अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. तर अनेक माजी मंत्र्यांवर पुन्हा विश्वास पक्षाने टाकला आहे. भाजपकडून अजूनही काही माजी मंत्री शपथविधीसाठी वरिष्ठांच्या फोनच्या प्रतिक्षेत आहेत.
भाजपाकडून संजय कुटे, रवींद्र चव्हाण, सुधीर मुनगंटीवार, गणेश नाईक यांना अद्याप मंत्रिपदासाठी कोणताही फोन आलेला नाही. त्यामुळे या माजी मंत्र्यांचा पत्ता कट होणार की काय, अशी चर्चा सुरु झाली आहे.
भाजपकडून गिरीश महाजन, नितेश राणे, शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार रावल, मंगलप्रभात लोढा, पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, पंकज भोयार यांना संपर्क करण्यात आला आहे.