क्राईम

तु मेलास तरी माझी मुलगी सुखी राहू शकते सासऱ्याने हिणवले

इंजिनिअर अतुल सुभाष यांच्या आत्महत्येचे प्रकरण ताजे असतानाच आता पुन्हा एकदा बंगळुरूत अशाच पद्धतीची घटना समोर आली आहे. अतुल सुभाष याने पत्नी आणि सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या केली होती. आता एका पोलिस शिपायाने पत्नी आणि सासऱ्याच्या धमक्यांना कंटाळून टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्या केलेल्या पोलिसाचे नाव एचसी थिपन्ना असे आहे. त्यांचे वय 34 वर्षे होते. थिपन्ना हे वाहतूक पोलिसात कार्यरत होते. 

थिपन्ना यांनी हीलाालिगे रेल्वे स्थानकात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास आत्महत्या केली. त्याच ठिकाणी शनिवारी सकाळी रेल्वे पोलिसांना त्यांचा मृतदेह सापडला. त्यावेळी त्यांच्या मृतदेहाजवळ त्यांची सुसाईड नोट मिळाली. त्यात त्यांनी आत्महत्येचे कारण स्पष्ट केले आहे. या सुसाईड नोटमध्ये त्यांनी पत्नी आणि सासऱ्यांवर मोठे आरोप केले आहेत. आपल्या मृत्यूस पत्नी आणि सासरा कारणीभूत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. 

सुसाईड नोटमध्ये थिपन्ना यांनी आपला सासरच्या लोकांकडून छळ होत होता. वारंवार त्रास दिला जात होता. मानसिक त्रासातून आपण जात होतो. शिवाय ते आपण सहनही करत होतो. मात्र आता सहन होण्यापलिकडे गेले होते. त्यामुळेच आपल्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे, असे त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. 

याच सुसाईड नोटमध्ये त्यांनी पुढे लिहीले आहे की 12 डिसेंबर रोडी सासरे यमुनप्पा यांनी फोन केला होता. हा फोन संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान आला. त्यावेळी सासऱ्यांबरोबर जवळपास 14 मिनिटे बोलणे झाले. या 14 मिनिटात ते आपल्याला केवळ धमकावत होते. त्यानंतरही मी त्यांना भेटण्यासाठीही गेलो होतो. त्यावेळी त्यांनी तू मर असे मला सांगितले. शिवाय तू मेला तरी माझी मुलगी आनंदी राहू शकते असे सुनावले. शिवाय आपल्या बरोबर गैरवर्तनही केले. दरम्यान सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa